मुंबई: आपल्या पीसी किंवा लॅपटॉपला आलेल्या Windowsचा अपडेट करणं जर तुम्ही टाळत असाल किंवा पुढे ढकलत असाल तर सावधान! आजच तातडीनं ते काम करा अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर अपड़ेट केलं नसेल तर आजच करा यासंदर्भात Microsoft कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


Windowsच्या नव्या अपडेटमध्ये युझर्ससाठी इंस्टेंट सिक्योरिटी अपडेट (Security Update) देण्यात आलं आहे. हे अपडेट केलं नाही तर तुमचा पीसी किंवा लॅपटॉप हँग होण्याची शक्यता आहे. इतकच नाही तर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉमधील डेटा असुरक्षित होऊ शकतो. त्याला धोका आहे त्यामुळे हे अपडेट तातडीनं करणं गरजेचं आहे. 


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे नवीन अपडेट 6 जुलैपासून ग्राहकांसाठी उपलब्ध झालं आहे. ज्यांनी हे अपडेट आपल्या Windowsसाठी केलं नाही त्यांनी तातडीनं करून घ्यावं. CVE-2021-1675 आणि CVE-2021-34527 हे दोन बन तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपमध्ये धोका निर्माण करू शकतात. तुमचा पीसी सुरक्षित करण्यासाठी हा बगचा धोका टाळण्यासाठी Windows अपडेट करणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. 

मायक्रोसॉफ्ट कंपनीने 'प्रिंट नाइटमेयर' बगला फिक्स केलं असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन अपडेट जारी केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात संशोधकाला आढळले की विंडोजच्या प्रिंट्स नाईटमेअरमध्ये काही त्रुटी आहेत. यामुळे हॅकर्स याचा गैरफायदाघेऊ शकतात. त्यामुळे कंपनीने या गोष्टी लक्षात घेऊन तातडीनं त्यावर काम सुरू केलं आणि नवीन अपडेट युझर्ससाठी आणला आहे.